गावाचा इतिहास


मौजे नंदगांव हे करवीर तालुक्‍‍याचे दक्षिणेस कोल्हापुर प‍ासून २० कि‍.मी. अंतरावर दुध्‍ागंगा नदीचे ति‍रावर वसले आहे. सन २००८ मध्‍ये गाव सर्वांच्‍या सहकार्याने प‍ूर्ण्‍ा गाव नि‍र्मल ग्राम झाले आहे व गावाला राष्ट्रप‌ती यांचे हस्‍ते प्रशस्ती प‍त्र व दोन लाख्‍ा रुप‍यांचे पारितोषिक मि‍ळ‍ाले आहे. गावाचे ग्रामदै‍वत भैरवनाथ आहे. तसेच गावात श्रीराम मंदीर व श्री हनुमान मंदीर, श्री महालक्ष्‍मी मंदीर, श्री म्‍‍हसोबा मंदीर इत्‍‍यादी देवालये आहेत.गावामध्‍ये प्रत्येक वर्षी प‍ारायण्‍ा सोहळ‍ा होत असतो.

तसेच श्रीराम मंदीर व श्री हनुमान मंदीर येथे दररोज प्रव‌चन हरि‍प‍ाठ होत असतो. डि‍सेंबर महि‍न्‍‍यामध्‍ये श्री दत्‍‍त जयंतीचा जन्‍‍म सोहळ‍ा मोठ्या प्रमाणात साज‌रा केला जातो. त्‍‍यावेळ‍ी पोवाडा, सोंगी भ‌जन, वि‍वि‍ध्‍ा स्‍प‍र्धा होत असतात. तसेच गावात श्री गणेश्‍ा उत्‍‍सव मोठ्या प्रमाणात होत असतो. सदर उत्‍‍सवावेळ‍ी गावात व्‍यसनमुक्‍‍ती, कुट‍ूंब नि‍योजन, ऐति‍हासि‍क, सामाजि‍क कार्यक्रम होत असतात. तसेच सजी‍व देखावे केले जातात‌. त्‍‍याचप्रमणे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्‍णा भाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.